वार्ताहर, कास
सातारा शहराच्या दिशेने निघालेल्या चारचाकी कारला यवतेश्वर घाटात आपघात झाला असुन गाडी तिनशे ते चारशे फुट दरीत कोसळली आहे. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
दुपारी साडेतिन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यवतेश्वर घाटातुन सातारा शहराच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना चारचाकी वाहन महादरे तळेच्या दिशेला दोनशे फुट दरीत कोसळले. या वाहनात सात प्रवासी असल्याची माहिती समोर आली असुन त्यातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मदत कार्यात स्थानिक नागरीक, वाहन चालक,पोलीस, ट्रेकर्स यांनी मदत कार्य राबवुन जखमींना उपचारासाठी रूग्णांलयात दाखल केल्याची माहीती समोर आली आहे.
Previous Articleदादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार ;सदा सरवणकरांची माहिती
Next Article जिल्ह्यात एनडीआरएफची दोन पथके दाखल









