सांबरा/वार्ताहर
मुतगे येथील ग्रामदेवता श्री भावकेश्वरी देवीच्या यात्रेला शुक्रवार दि. 14 पासून प्रारंभ होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. शुक्रवार दि. 14 रोजी पहाटे मंदिरात हक्कदारांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दिवसभरात ओटी भरणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम होतील. रात्री बारानंतर गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम होईल. शनिवार दि. 15 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.









