वार्ताहर/ कराड
आरसी क्रिकेट अॅ कॅडमी सातारच्या वतीने आयोजित केलेल्या आरसी चषक 2023 या 17 वर्षाखालील क्रेकेट स्पर्धेत कराडच्या यशवंतराव चव्हाण क्रिकेट अॅपॅडमीने सातारच्या आरसी क्रिकेट अॅ कॅडमीचा 26 धावांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले. या सामन्यात सर्वाधिक 68 धावा काढणाऱ्या अर्थ पाटीलचा उत्कृष्ठ फलंदाज व सामनावीरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाचगणी येथे झालेल्या या सामन्यात सातारा, सांगलीसह पुण्यातून अनेक संघांनी सहभाग घेतला. कराडच्या यशवंतराव चव्हाण क्रिकेट अॅपॅडमी विरूद्ध सातारच्या आरसी क्रिकेट अकॅडमीत अंतिम सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कराडच्या संघाने 20 षटकात 172 धावा केल्या. तर आरसी अकॅडमीला केवळ 146 धावा करता आल्या. यशवंतराव चव्हाण क्रिकेट अॅ कॅडमीने 26 धावांनी हा सामना जिंकत आरसी चषक पटकावला.
या सामन्यात 68 धावा व एक बळी घेणाऱ्या अर्थ पाटीला उत्कृष्ठ फलंदाज व सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून अलोक गायकवाड व मालिकावीर म्हणून ओंकार गायकवाड यास गौरवण्यात आले. यशवंतराव चव्हाण अ कॅडमीच्या सुजय पाटील याने 33, ओंकार गायकवाड याने 29 व अथर्व साळुंखे याने 20 धावा काढल्या. निरंजन भोसलेने 4 षटकांत 30 रन व 3 बळी मिळवले.
आरसी क्रेकेट अॅ कॅडमीच्या अथर्व पवार याने 55 धावा, अव्दैत प्रभावळकर 22 धावा, पार्थ 33 व हर्ष जाधव याने 16 धावा काढल्या. आदित्य साळुंखे याने 4 षटकात 33 धावा देत 2 बळी मिळवले. कराडच्या यशवंतराव चव्हाण क्रिकेट अॅ कॅडमीने 26 धावांनी सामना जिंकत आरसी चषकावर नाव कोरल्यानंतर संघाच्या खेळाडूंनी जल्लोष केला.








