सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले लिंगवतवाडी येथील सौ. यमुनाबाई गोविंद लिंगवत ( 81) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या मनमिळावू ,शांत स्वभावाच्या होत्या . सौ . लिंगवत यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, विवाहित चार मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन गोविंद उर्फ भगत लिंगवत यांच्या त्या पत्नी होत. तर, पुणे येथील दिनेश ऍडव्हरटायजिंगचे दिनेश लिंगवत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









