किंमत 7 हजार रुपये : कंपनीचा परवडणारा 4 जी स्मार्टफोन
वृत्तसंस्था /मुंबई
शाओमी कंपनीचा नवा रेडमी ए वन प्लस स्मार्टफोन बाजारामध्ये लाँच करण्यात आला आहे. सदरचा स्मार्टफोन 7 हजार रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा सर्वात परवडणाऱया किमतीतील फोन आहे. 4 जी स्मार्टफोन क्षेत्रामध्ये या फोनला ग्राहकांनी अधिकची पसंती दर्शविली आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 5000 एमएएच क्षमतेची असून 6.5 इंचाची एचडी प्लस स्क्रीन यामध्ये असणार आहे.
विक्री कधी सुरु
सदरच्या स्मार्टफोनची विक्री 17 ऑक्टोबरपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. लाईट ग्रीन, ब्लॅक आणि लाईट ब्ल्यू या रंगामध्ये हा फोन खरेदी करता येणार आहे. दोन प्रकारामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार असून 2 जीबी रॅमसह येणाऱया फोनची किमत 6999 रुपये तर 3 जीबी रॅमसह येणाऱया फोनची किमत 7999 रुपये असणार असल्याची माहिती आहे. ए वन प्लसमध्ये 32 जीबी स्टोअरेजची व्यवस्था असून एसडी कार्डच्या मदतीने 512 जीबीपर्यंत स्टोअरेज वाढवता येण्याची सुविधा असणार आहे.
कॅमेरा
यामध्ये 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा असणार आहे. 10 डब्ल्यूचा चार्जर यासोबत येणार असून 31 तासापर्यंत कॉलिंगची सुविधा या फोनवर वापरता येणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.









