वृत्तसंस्था/ बीजिंग
चीन टेक कंपनी शाओमीने हायपरओएस नावाच्या ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ लेई जून यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की अनेक वर्षांच्या सामूहिक कार्यानंतर, आमची नवीन ऑपरेटिंग सिस्टम, शाओमी हायपरओएस, शाओमी 14 मालिकेसह अधिकृतपणे सादर होण्यास तयार आहे.
मीडिया अहवालानुसार शाओमी हळूहळू एमआयुआय ला हायपरओएसने बदलणार आहे किंवा विवोप्रमाणे कंपनी वेगवेगळ्या मार्केटमध्ये दोन भिन्न ऑपरेटिंग सिस्टमसह आपले डिव्हाइस सादर करु शकणार आहे. विवोने चीनमधील ओरिजिन ओएस आणि फनटेक ऑपरेटिंग सिस्टमसह भारतीय बाजारात आपले डिव्हाईस सादर केले आहे.
भारतातही नवीन ऑपरेटिंग सिस्टम होणार लाँच?
कंपनीच्या सीईओनी अद्याप ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम चीनसह भारतात किंवा इतर जागतिक बाजारात सादर केली जाणार आहे, की नाही याची माहिती दिलेली नाही. यामुळे फक्त चीनपुरते मर्यादित राहणार आहे.









