नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी विक्रमी तिसर्यांदा पुन्हा निवडून आले. विजयानंतर त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी पॉलिटब्युरो सदस्यांना चीनची सर्वोच्च सत्ताधारी संस्था असलेल्या स्थायी समितीमधून बाहेर काढले. विजयानंतर शी जिनपिंग यांनी आपल्या नव्या टिममध्ये निष्ठावंतांचा भरणा केला असल्याचे आंतराष्ट्रिय माध्यमांनी सांगितले आहे. जिनपींग यांनी माओ झेडोंग यांच्यानंतर देशातील सर्वात शक्तिशाली शासक आपले स्थान निर्माण केले आहे.
स्थायी समितीच्या मंडळात 7 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये शी जिनपींग यांच्या कुटुंबाशी पिढ्यानपिढ्या संबंध असलेल्यांचा आणि अलीकडील विश्वासू सहाय्यकांचा समावेश आहे. या संबंधीची माहीती द गार्डियन या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









