बेळगाव : फिनिक्स स्कूल आयोजित फिनिक्स चषक 14 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स संघाला उपविजेत्यापदावरती समाधान मानावे लागले. सदर स्पर्धेत साखळी सामन्यातून सेंट झेवियर्सने संत मीराचा 2-0 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे नील पाटील, आर्कान बादीगर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात झेवियर्सने पोतदार इंटरनॅशनल संघाचा 3-0 असा पराभव केला. डीव्हीएसतर्फे सादीक ताशिलदारने 1 तर आर्कानने 2 गोल केले. तिसऱ्या सामन्यात झेवियर्सने शेख सेंट्रलचा 3-0 असा पराभव केला.
त्यांच्यातर्फे गौस भैरकदार, समर्थ भंडारी, नील पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात झेंवियर्सने संजय घोडावतचा 2-0 असा पराभव केला. सादीक ताशिलदाराने 2 गोल केले. अंतिम सामन्यात सेंट पॉल्स संघाकडून टायब्रेकरमध्ये झेवियर्सला पराभवाला सामोरे जावे लागले. मुख्याध्यापकांच्या हस्ते संघाच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. या संघात उजेयर रोटीवाले, श्रेयेस धामणेकर, समर्थ भंडारी, अबुजर तिगडी, कार्तिकेश जळगेकर, मंदिप सिंग, नील पाटील, झियान मुल्ला, सादीक ताशिलदार, आर्कान बादीगर, गौस भैरकदार, अजिक अथणी, अनिकेत पाटील, नवीन पिल्ले, यश पाटील, श्रेयश खटावकर आदी खेळाडूंचा समावेश होता. या संघाला मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभले.









