अकरा खेळाडूंची विभागीय संघात निवड
बेळगाव : विजापूर येथे सार्वजनिक शिक्षण खाते बेंगळूर मान्यताप्राप्त विजापूर जिल्हा शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय प्राथमिक मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सेंट झेवियर्सने धारवाडचा पराभव करून विजेतेपद पटकावित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बेळगाव विभागीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स संघाने गदग संघाचा 7-0 असा पराभव केला. बेळगाव संघातर्फे श्रावणी सुतारने 3, इफार अत्तारने 2 तर इंद्रायणी पावनोजी आणि मनाली झेंडे प्रत्येकी 1 गोल नोंदविले. अंतिम सामन्यात बेळगाव संघाने धारवाड संघाचा 6-0 असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. श्रावणी सुतारने 2, इफार अत्तार, मारिया मुजावर, इंद्रायणी पावनोजी व मनाली झेंडे यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. दि. 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान बेंगळूर येथे होणाऱ्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव विभागीय फुटबॉल संघ पात्र ठरला आहे. या संघात गौरी कलगौडर, प्रांजल हजेरी, श्रावणी सुतार, श्रद्धा पाटील, मयुरी तिम्मापूर, जानवी चव्हाण, अफिफा बडेभाई, इफार अत्तर, मारिया मुजावर, निधी नागोजीचे, तेजल हंसी, प्राप्ती कुरणे, इंद्रायणी पावनोजी, मनाली झेंडे, श्रीशा कोचेरी, गायत्री बडीगेर, सुचित्रा होंडाई, विजयलक्ष्मी चौगुला, वैष्णवी होसमणी आदींचा समावेश आहे. या संघाला सेंट झेवियर्स स्कूलच्या क्रीडा शिक्षिका ज्युलीएट फर्नांडिस, मानस नायक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.









