म्हापसा
सेंट झेवियर्स महाविद्यालयात काही बाहेरील आपण अभाविपचे विद्यार्थी असल्याचे सांगून कॉलेजच्या वर्गात येऊन त्यांना धरणे कार्यक्रमात सामील व्हा, असे म्हणणाऱ्या विद्यार्थीवर्गाचा सेंट झेवियर महाविद्यालयाच्या प्राचार्य व शिक्षकवर्गांनी निषेध व्यक्त केला आहे.
आमच्या वर्गात परीक्षा सुरू होत्या. शिवाय बाहेरून आलेले विद्यार्थी आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बाहेर काढू पाहत होते. पोलिसांनाही ते उडवाउडवीची उत्तरे देऊन प्राचार्याच्या कार्यालयात घुसण्याच्या प्रयत्नात होते. या विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा आम्ही निषेध करीत असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य फादर टोनी सलीमा यांनी म्हटले आहे. हे प्रकरण योग्यरित्या हाताळल्याबद्दल म्हापसा पोलीस व संयुक्त मामलेदार वर्षा परब यांचे त्यांनी आभार मानले आहेत.









