ऑनलाईन टीम
भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. इंग्लंडमधील साऊदम्पटन येथे हॅम्पशायर मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने येत आहेत. परंतु, क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. साऊदम्पटनमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने खेळ वेळेत सुरु होण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
इंग्लंडमधील स्थानिक वेळेनुसार सामना सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. परंतु, साऊदम्पटनमध्ये रात्रभर धुव्वाधार पाऊस झाला आहे. त्यामुळे भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीनला सुरू होणारा सामन्याची वेळ आता पाऊस ठरवणार आहे. हवामान खात्याने साऊदम्पटनमध्ये स्थानिक वेळेनुसार आज दुपारी एक वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच पावसाची संततधार सुरु राहील असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच सामना वेळेत सुरु होणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पहिल्या दिवसाचे संपूर्ण पहिले सत्र पावसाचीच बँटींग सुरु राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









