अजय गोंदावळे ; प्रत्येक तालुक्यात “फॉर्म” बुथच्या माध्यमातून वाटप करणार
भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गायक जुबिन नौटियाल यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना “रिस्ट बँड” घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परब यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात बुथ लावून हे बँड वाटप करण्यात येणार आहेत . अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान या कार्यक्रमासाठी भाजपचे केंद्रीय व राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच ९ तारखेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी.









