वार्ताहर/सांबरा
निलजी येथे गुरुवार दिनांक 17 रोजी श्री ब्रम्हलिंग यात्रेनिमित्त श्री ब्रम्हलिंग कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थांच्या वतीने विराट कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध सोनू कुमार दिल्ली यांच्यात होणार आहे. दुस्रया क्रमांकाची कुस्ती मध्य प्रदेश केसरी सुदेश ठाकूर विरुद्ध विक्रम घोरपडे यांच्यात होणार आहे .तर तिस्रया क्रमांकाची कुस्ती शुभम भोसेकर विरुद्ध शिवा दड्डी यांच्यात होणार आहे .यासह 50 हून अधिक चटकदार कुस्त्या मैदानात होणार आहेत . गुरुवार दिनांक 17 रोजी दुपारी अडीच वाजता ब्रह्मलिंग मैदानामध्ये कुस्त्या होणार असून कुस्ती शौकिनानी कुस्ती आखाड्याचा लाभ घ्यावा असे श्री ब्रम्हलिंग कुस्तीगीर संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.









