वार्ताहर/नंदगड
नंदगड येथील लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त सोमवार दि. 17 रोजी दुपारी 3 वाजता महात्मा गांधी कॉलेज जवळ भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती शिवराज राक्षे पुणे विरुद्ध जलील इराण यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील पुणे विरुद्ध आशिष हुडा यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश बनकर गंगावेश तालीम विरुद्ध पवन कुमार हरियाणा केसरी, चौथ्या क्रमांकाची कुस्ती माऊली जमदाडे गंगावेश तालीम विरुद्ध विक्रांत कुमार हरियाणा यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती कार्तिक काटे डबल कर्नाटक केसरी विरुद्ध सुमित कुमार हरियाणा केसरी यांच्यात होणार आहे. सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रसाद सस्ते विरुद्ध श्रीमंत भोसले, सातव्या क्रमांकाची कालीचरण सोलंकर विरुद्ध उदय कुमार दिल्ली यांच्या, आठव्या क्रमांकाची उमेश चव्हाण विरुद्ध शिवय्या पुजारी यांच्यात, नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी विरुद्ध सतीश खरात, दहाव्या क्रमांकाची कुस्ती नाथा चौगुले विरुद्ध शिवा दड्डी यांच्यात, अकराव्या क्रमांकाची कुस्ती पार्थ लहान कंग्राळी विरुद्ध परमानंद धारवाड यांच्यात होणार आहे. आखाड्यात नियोजित 50 कुस्त्या होणार आहेत.
मेंढ्याची कुस्ती रोहित माचीगड विरुद्ध राज पवार सांगली यांच्यात होणार आहे. शिवाय आखाड्यात महिलांच्या ही कुस्त्या होणार आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती प्रांजल यळ्ळूर विरुद्ध राधिका मुधोळ यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती शितल खादरवाडी विरुद्ध ऋतुजा गणेबैल यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती तनुजा खानापूर विरुद्ध ऋतुजा वडगाव यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती समीक्षा यळ्ळूर विरुद्ध साधना माळअंकले, पाचव्या क्रमांकाची कुस्ती आराध्या यळ्ळूर विरुद्ध मनस्वी मजगाव, सहाव्या क्रमांकाची कुस्ती भक्ती मोदेकोप विरुद्ध समीक्षा खानापूर यांच्यात तर सातव्या क्रमांकाची कुस्ती समिधा वडगाव विरुद्ध आदिती खोरे यांच्यात होणार आहे. उद्घाटनाची कुस्ती रोहित धबाले नंदगड विरुद्ध रिधान मजगाव यांच्यात होणार आहे.
कुस्तीच्या उद्घाटनासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, आमदार भालचंद्र जारकीहोळी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार महांतेश दोडगौडर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील, कुस्ती कमिटीचे अध्यक्ष अशोक गोरे, उद्योजक वल्लभ गुणाजी, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे, उपाध्यक्ष सुभाष ढवळेश्वर, आदीसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कुस्ती कमिटीचे अध्यक्ष अशोक गोरे यांनी केले आहे.









