महाराष्ट्र मैदान आज सज्ज, शेरा व मिर्झा यांच्यातील लढतीकडे लक्ष
बेळगाव : येळ्ळूर येथे येळ्ळूर कुस्तीगीर संघटना आयोजित कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त लोकमान्य को-ऑप. सोसायटी पुरस्कृत आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन गुरुवार दि. 24 रोजी येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात आयोजित करण्यात आले आहे. भारताचा अव्वल मल्ल महानभारत केसरी शेरा-पंजाब व इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल मिर्झा इराण यांच्यात प्रथमच बेळगावात कुस्ती होणार आहे. यासाठी महाराष्ट्र मैदान सज्ज झाले आहे. जवळपास 50 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. या मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रुस्तुमे हिंद व डबल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व भारत केसरी अमिन बिनीया-जम्मू काश्मिर यांच्यात होईल. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन-पुणेचा शिवा महाराष्ट्र उर्फ रवी चव्हाण वि. भारत केसरी-हरियाणाचा रोहीत हरियाणा यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती युपी केसरी राजू मलंगा-हरियाणा व डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात,
सहाव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन शिवय्या पुजेरी वि. सतीश मुडे-आडपाटी, सातव्या क्रमांकाची कुस्ती विशाल शेळके-सांगली वि. कर्नाटक केसरी शिवा दड्डी, आठव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी वि. शुभम चव्हाण-पुणे, नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी व सौरभ काकडे, दहाव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी वि. संजू इंगळगी यांच्यात होणार आहे. आकर्षक कुस्ती सौरभ पाटील व प्रथमेश हट्टीकर-कंग्राळी, विनायक पाटील-येळ्ळूर व विजय होळकर-सांगली यांच्यात होणार आहे. याशिवाय 80 हून अधिक चटकदार कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी जवळपास 50 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांच्या बसण्याची सोय करण्यात आली असून मैदानातही स्क्रीनची व्यवस्थाही केली आहे. या मैदानाला विजापूर, दावणगेरी, हावेरी, गदक, धारवाड, हुबळी, बागलकोट येथून कुस्ती शौकिन येतात. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील विविध खेड्यांतून कुस्ती शौकिनांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली. या कुस्ती मैदानात लोकमान्य को. ऑफ. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुरसह लोकमान्य को. ऑफ. ची सभासद उपस्थित राहणार आहेत. या शिवाय प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.









