शिवा महाराष्ट्र वि. सोहेल इराण प्रमुख लढत
वार्ताहर/मजगाव
मजगाव येथील कुस्ती मैदान बुधवार दि. 16 एप्रिल रोजी भरविण्यात येणार आहे. या मैदानात प्रथम क्रमांकाची लढत आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुणे-शिवा महाराष्ट्र वि. सोहेल इराण, द्वितीय क्र.लढत बाळू बोडके-पुणे वि. अमित पंजाब, तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कर्नाटक केसर-कार्तिक काटे वि. मिलाद इराण, चौथ्या क्रमांकाची कुस्ती गंगावेसचा शुभम कोळेकर वि. इचलकरंजीचा श्रीमंत भोसले यांच्यात होणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती शिवा दड्डी वि. करन हरियाणा, सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी वि. सौरभ काकडे-पुणे, सातव्याक्रमांकाची कुस्ती कामेश पाटील-कंग्राळी वि. आकाराम कोळेकर अशा 50 हून अधिक चटकदार लढती होणार आहेत. सदर कस्त्यांचे मैदान बुधवारी येथील सावरी तलावाच्या सुसज्ज मैदानात दुपारी 3 वाजता होणार आहेत. यासाठी मजगाव कुस्तीगीर कमिटीचे सर्व सदस्य व गावकरी, युवक मंडळांचे पदाधिकारी एकजुटीने कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. दि. 13 पासून गाडे यात्रेला प्रारंभहोत असून गाडे यात्रा व कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्य, नगरसेविका व चेअरमन यासाठी प्रयत्न करत आहेत.









