वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीची तारीख 8 डिसेंबरनंतर जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. विश्व कुस्ती फेडरेशनकडून भारतीय कुस्ती फेडरेशनला निवडणूक घेण्याचा आदेश लवकरच बजावला जाईल, असे विश्वसनीय गोटातून सांगण्यात आले आहे. अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने स्टे ऑर्डर बजावली होती.
अनेक भारतीय मल्लांनी अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनचे प्रमुख ब्रिजभूषण शरणसिंग यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती फेडरेशन बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. ऑलिम्पिक मल्ल बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांनी ब्रिजभूषण शरणसिंग यांची प्रमूख पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी करताना जंतर-मंतर येथे धरणे तब्बल दोन महिने धरले होते.









