भारतीय कुस्तीपटू संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात काही महिला कुस्तीपटूंनी शारीरीक शोषण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी खेळाडूंकडून जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आज जंतरमंतरवर खेळांडूची भेट घेत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.यावेळी त्यांनी सरकारवर टीका जोरदार टीका केली. जंतरमंतरवरील या कुस्तीपटूंची ही चळवळ क्रीडा व्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ही जंतरमंतरची पवित्र भूमी आहे.आम्ही येथून सुरुवात केली होती. येथील आंदोलनाने देशाचे राजकारण बदलले होते.आज माझे मन म्हणते की या मुलांची, या कुस्तीपटूंची ही चळवळ क्रीडा व्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणेल अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.
देशासाठी पदक जिंकणारे खेळाडू गेल्या एका आठवड्यापासून जंतरमंतर आंदोलन करत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी लाजीरवाणी बाब आहे. केंद्र सरकारने अद्यापही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. हा खेळाडूंचा अपमान आहे. खरं तर महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट फासावर चढवलं पाहिजे”, अशी संतप्त प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









