मंदिरांतून दर्शनासाठी गर्दी ; घरांतून हळदी-कुंकू कार्यक्रम
बेळगाव : श्रावण महिन्यातील शुक्रवारनिमित्त वरद महालक्ष्मीचे पूजन अनेक घरांतून झाले. महिलांसाठी वरद महालक्ष्मी पूजनाचे महत्व खूपच वेगळे आहे. पुराणातील संदर्भानुसार वरद महालक्ष्मी ही भगवान विष्णुची पत्नी आहे. तिला लक्ष्मीचा अवतार म्हटले आहे. त्यामुळेच श्रावणातील शुक्रवारी तिचे पूजन करण्याची प्रथा ऊढ झाली आहे. धन, समृद्धी व सुख-शांतीसाठी हे व्रत केले जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवार हे व्रत करण्यासाठी श़ुभ मानले गेले आहे. सकाळी घरातील दैनंदिन पूजाअर्चा आटोपल्यानंतर सुहासिनी वरद महालक्ष्मी पूजनाला लागल्या. महालक्ष्मीची षोडशोपचार पूजा करून नैवेद्य दाख]िवला. खीर, पांढरा भात, वरण, मसाले भात, भजी, पुरणाने बनविलेले कड़बू हे नैवेद्यातील प्रमुख घटक होते. देवीची कथा वाचन झाल्यानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर, वाण देण्यात आले. तद्नंतर सुहा]िसनीसह घरातील सदस्यांनी भेजनाचा आस्वाद घेतला वरद महालक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने शहर, उपनगरांतील लक्ष्मी मंदिरांमधून दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली. सायंकाळी अनेक घरांतून हळदी-कुंकू झाले.









