कोल्हापूर :
दख्खनचा राजा श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील जोतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया गेले दोन दिवस जोतिबा मंदिरात सुरू आहे , यावेळी उत्सव मूर्ती गाभ्रायात ठेवून भाविकांसाठी सर्व कुलाचार विधी व दर्शन विधी सुरू केली आहे , भाविक भक्त पूजा आर्च्या व दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करून आहेत.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता धार्मिक वातावरणात जोतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सुरू झाली आहे , दिल्ली येथील केंद्रीय पुरातत्व विभागाचे पथक डोंगरावर दाखल झाल्यानंतर यावेळी मंदिर परिसरात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुरातत्त्वाच्या अधिक्रायांशी चर्चा केली , यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे , देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे , जोतिबा देवस्थानचे इन्चार्ज आधिकारी धैर्येशील तिवले व पुजारी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मुख्य मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या केंद्रीय पथकातील तंत्रज्ञानाना होमहवन मंडपात बसवून विविध धार्मिक विधी केली , त्यानंतर मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली , दरम्यान सोमवारपासून मुख्य मंदिरातील गाभ्रायात मूर्तीवर धार्मिक विधी करून गाभारा बंद केला आहे व जोतिबा मंदिरांतील कासव चौकात श्रीची उत्सव मूर्ती ठेवली आहे याठिकाणी भक्तगण उत्सव मूर्तीचे दर्शन घेऊन पुजा अर्चा करून कुलाचार विधी करत आहेत दरम्यान शुक्रवार पर्यंत चार दिवसात ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या संवर्धन प्रक्रियेसाठी कोल्हापुरात जोतिबा येथील प्रमुख दहागावकर प्रतिनिधी , जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच स्थानिक पुजारी , पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व सहाय्यक संचालक राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या मध्ये झालेल्या चर्चेनंतर संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या रासायनिक प्रक्रियाच्या निमित्ताने विविध धार्मिक विधीने मंदिर परिसर दुमदुमत आहे मुख्य मंदिर परिसरात महारुद्र अनुष्ठान , अभिषेक , होम हवन मार्जन , तर्पन प्रायश्चित केदार सहस्त्रनाम , आदी धार्मिक विधीना प्रारंभ झाला , हा विधी सोमवार पासून ते शुक्रवार पर्यंत धार्मिक विधी होणार आहेत , संवर्धन प्रक्रिया झाल्यानंतर मूर्ती दर्शनासाठी खुली ठेवली जाणार आहे , दर्शनासाठी येण्राया भाविकांनी प्रशासनास व पुजारी वर्गीस सहकार्य करावे असे आव्हान देवस्थान समितीने केली आहे.








