प्रतिनिधी / बेळगाव
श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने आज वटपौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहरात प्रथमच सावित्रीच्या मूर्तीचे पूजन मंदिराच्या परिसरात करण्यात आले आहे. हे दृश्य पाहून मंदिरा मध्ये आलेल्या सुहासिनींकडून विधीवत वडाच्या झाडाचे तसेच सावित्रीच्या मूर्तीचे पूजन करण्यात येत आहे मंदिर मंदिर ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे उपवास केलेल्या महिलांसाठी अल्पोपहार तसेच दुधाचे वाटप करण्यात आले.









