गणेशोत्सव तयारीच्या कामाला लागली महापालिका
प्रतिनिधी/ बेळगाव
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्यावतीने त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते कपिलेश्वर तलावाचे पूजन शुक्रवारी करण्यात आले. या तलावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे त्याची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.
कपिलेश्वर तलावामध्ये दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यासाठी स्वच्छता करण्यात येते. आता या दोन्ही तलावांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. पूजन करताना आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीशैल कांबळे, जयतीर्थ सौंदत्ती, रेश्मा कामकर, नेत्रावती भागवत यांच्यासह इतर नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.









