कित्तूर चन्नम्मा येथील गणेश मंदिरात झाले पूजन
प्रतिनिधी /बेळगाव
पूर्ण शाडूची असलेली कोणताही रंग न देता पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे पूजन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कित्तूर चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरामध्ये विधिवत पूजन करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ती मूर्ती नेण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी पुढे पुढे जात होते.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापन करून त्याचे पूजन करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येते. त्याच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱयांनी या मूर्तीचे पूजन करून जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. यावेळी पर्यावरण खात्याचे अधिकारी जगदीश, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, शिरस्तेदार मंजुनाथ जानकी, महसूल अधिकारी एस. एम. परगी, निंगनगौडा पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









