अंड्यासारखा आकार, मधल्या जागेत अनेक इमारती
रस्त्यांवर होणारी निर्मितीकार्ये ही रस्तेसुरक्षेसाठी असतात. रस्त्याचे डिझाइन लोकांना स्वत:चे वाहन सुरक्षेसह चालविता यावे यादृष्टीने तयार केलेले असते. याचमुळे चौकांची निर्मिती होते. जेथे कुठे चार रस्ते एकत्र येतात, तेव्हा त्या ठिकाणी चौक निर्माण होत असतो. तर त्या मीटिंग पॉइंटला गोल आकार देण्यात येतो. स्वत:च्या शहरांत देखील चौक पाहिले असेल, जे छोटे किंवा मोठे असतील. परंतु जगातील सर्वात मोठा राउंडअबाउट म्हणजेच चौक तुम्ही पाहिला नसेल.

मलेशियातील पुत्राजया शहरात जगातील सर्वात मोठा चौक आहे. हा चौक एखाद्या क्रिकेटच्या मैदानापेक्षाही मोठा आहे. पुत्राजया येथील चौकाचा सर्कमफ्रेंन्स म्हणजचे परिघ 3.4 किलोमीटर इतका आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून याला जगातील सर्वात मोठ्या चौकाचा विक्रम प्राप्त आहे.
या चौकाला पर्सिअरन सुल्तान सलाहुद्दीन अब्दुल अजीज शाह राउंडअबाउट देखील म्हटले जाते, कारण याच्या मधोमध मलेशियाच्या राजाचा दुसरा सर्वात मोठा महाल देखील आहे. तसेच पंतप्रधानांचे ऑफिस कॉम्प्लेक्स देखील आहे. याचबरोबर एक मोठी मशीद आणि पंचतारांकित हॉटेल देखील या चौकाच्या मधोमध आहे. या चौकाच्या आत अन् बाहेर जाण्यासाठी 15 मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.
या चौकाची निर्मिती मलेशियाची स्थापत्यकार हिजास कस्तुरी यांनी करविली होती. याला आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंगचे उदाहरण मानले जाते. राउंडअबाउटचा आकार पूर्णपो गोल नाही तर अंडाकृती आहे. यात वाहतूक केवळ एका दिशेने चालते.









