पृथ्वीसाठी मानला जातोय धोकादायक
सायबेरियात जगातील सर्वात मोठा पर्माफ्रॉस्ट खड्डा आहे. पर्माफ्रॉस्ट म्हणजे जेथे जमीन, माती कोट्यावधी-अब्जावधी वर्षापासून हिमाच्छादित वातावरणात गोठलेली असते. परंतु हा खड्डा आता चिंतेचा विषय ठरत चालला आहे. या खड्डायाचा आकार सातत्योन वाढत आहे. या खड्डायाला बाटागाइका, बाटोगे किंवा बागाटाइका म्हटले जाते.
सायबेरियात एका वृत्तवाहिनीने या ख•dयाचे ड्रोनद्वारे चित्रण केल्यावर या ख•dयाचा आकार सातत्याने वाढत असल्याचे समोर आले. हा खड्डा 0.8 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेला आहे. याच्या आत 145 फुटबॉल मैदाने सामावू शकतील. जंगलतोडीमुळे येथे मातीची धूप सुरू झाली होती. याचमुळे सातत्याने येथील जमिनीखाली गोठलेला बर्फ वितळू लागला आणि येथे मोठा दलदलयुक्त खड्डा तयार झाला. पर्माफ्रॉस्टमध्ये 80 टक्के बर्फ असतो. यानंतर माती किंवा वाळू किंवा झाडांचे अवशेष असतात. बर्फ वितळू लागल्यावर उर्वरित गोष्टींमुळे चिखल तयार होऊ लागतो.

आकाशातून याकडे पाहिल्यास हा खड्डा एखाद्या मोठ्या माशासारखा दिसून येतो. हा खड्डा सायबेरियाच्या साखा रिपब्लिक भागत आहे. या खड्डायाचा आकार सातत्याने वाढत असल्याचे पुरावे उपग्रहीय छायाचित्रांद्वारे देखील मिळाले आहेत. येथे हजारो-कोट्यावधी वर्षांपूर्वी गोठलेली जमीन अन् चिखल आहे.
या खड्डायात 1.26 लाख वर्षे जुनी माती अन् बर्फ असून तो मध्य प्लीस्टोसीन काळातील असल्याचे मानले जाते. एका अध्ययनादरम्यान येथे वैज्ञानिकांना एका बाडसनचे मांस मिळाले होते, हे मांस सुमारे 8 हजार वर्षे जुने होते. येथील बर्फ वितळू लागल्यावर हे अवशेष दिसून आले होते. येथे कधीकाळी प्राणी अन् झाडांचे प्रमाण मोठे होते.
अचानक या खड्डयाचा आकार वेगाने का वाढतोय याचे कारण वैज्ञानिकांना अद्याप समजू शकलेले नाही. परंतु आसपास राहणाऱ्या स्थानिक लोकांनुसार मागील काही वर्षांमध्ये या खड्डयाची खोली 66 फुटांवरून 98 फूट झाली आहे. ही एक अत्यंत दुर्लभ घटना असून याची पुष्टी रशियाचे वैज्ञानिक देखील करतात. ही खरोखरच एक दुर्लभ घटना आहे. आमच्या पृथ्वीला कशाप्रकारे हवामान बदलापासून धोका आहे हे यातून दिसून येते. लाखो वर्षांपूर्वी बर्फात गोठलेली जमीन आता चिखल अन् खड्डयात रुपांतरित होत असल्याचे उद्गार रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे वैज्ञानिक एलेक्सी लुपाचेव्ह यांनी काढले आहेत.









