जेनेटिक एडिटिंगची कमाल
अर्जेंटीनाची पुरस्कार विजेती अश्व पोलो प्यूरेजाचे जीन आता पाच जेनेटिक एडिटेड अश्वांमध्ये जिवंत राहणार आहेत. हे अश्व स्वत:च्या पूर्वजांपेक्षा अधिक सक्षम असून अत्यंत वेगाने धावतात, तसेच तंदुरुस्त आणि अधिक शक्तिशाली आहेत.
अर्जेंटीनाची बायोटेक फर्म खेरियनच्या वैज्ञानिकांनी सीआरआयएसपीआर-सीएएस9 नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करत जगातील पहिल्या आनुवांशिक स्वरुपात संपादित अश्वांना विकसित केले आहे. या अश्वांचा जन्म ऑक्टोबर आणि नोव्हेंबरदरम्यान झाला होता. खेरियनचे सह-संस्थापक आणि वैज्ञानिक संचालक गॅब्रियल विचेरा यांनी आम्ही अश्वांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या जिनोमला डिझाइन करत असल्याचे सांगितले आहे.
पोलो प्यूरेजा नावाच स्पॅनिश भाषेतील अर्थ ‘शुद्धता’ असा होतो. याला अर्जेंटीना असोसिएशन ऑफ पोलो हॉर्स ब्रीडर्स हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आले होते. वैज्ञानिकांनी 5 अश्वांसाठी आनुवांशिक आधाराच्या स्वरुपात पोलो प्यूरेजामधून जीन मिळविले, जेणेकरून चॅम्पियन अश्वाच्या अन्य गुणवत्तांना कायम ठेवता येईल. याचे लक्ष्य या जीन्सना एकाच पिढीत एक अचूक पद्धतीने सामील करणे होते असे विचेरा यांनी सांगितले.
याचा अर्थ अश्व आनुवांशिक डोपिंग किंवा आनुवांशिक स्वरुपात संशोधि जीवांच्या श्रेणीत येत नाहीत. आम्ही काहीही कृत्रिम तयार करत नाही आहोत, तर आम्ही नैसर्गिक सीक्वेंसला आणत आहोत. आम्ही त्याला एका अन्य नैसर्गिक अश्वाच्या स्वरुपात सादर करत आहोत. जी निसर्गाची प्रक्रिया आहे, परंतु आम्ही याला वेगाने अधिक लक्ष्यित पद्धतीने करतो. हे तंत्रज्ञान वैज्ञानिकांना कुठल्याही अश्वाच्या जीनोमला समायोजित करण्यास सक्षम आहे. खेरियन डुकरांना संशोधित करण्यावरही काम सुरू आहे जेणेकरून त्यांचे अवयव मानव प्रत्योरापणासाठी सुसंगत ठरतील असे विचेरा यांनी सांगितले.









