वृत्तसंस्था / मनामा (बहरीन)
विश्व वेटलिफ्टींग चॅम्पियनशीप स्पर्धा बहरीनमध्ये शनिवारपासून सुरू होणार असून या स्पर्धेत तीन महिला वेटलिफ्टर्सचा भारतीय संघ सहभागी होणार आहे. सदर स्पर्धा 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेमध्ये भारताची महिला वेटलिफ्टर तसेच 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदक विजेती मिराबाई चानुच्या जागी ज्ञानेश्वरी यादव 49 किलो गटात तसेच बिंदीयाराणी देवी 55 किलो गटात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मिराबाईचे पदक थोडक्यात हुकले होते. तसेचअ दितीमोनी सोनोवाल 64 किलो वजन गटात बहरीनच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. मात्र या विश्व वेटलिफ्टींग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या एकाही पुरुष वेटलिफ्टरचा समावेश नाही.









