अर्चना बनगे,प्रतिनिधी
World Vegetarian Day : जागतिक शाकाहारी दिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पर्यावरण, आरोग्य संदर्भात माहिती आणि जागृती करण्याचे काम या दिवशी केले जाते. एका अहवालानुसार, जगाच्या लोकसंख्येपैकी २२ टक्के लोक शाकाहारी आहेत. जागतिक शाकाहारी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १९७७ मध्ये नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीने केली. ज्याला नंतर आंतरराष्ट्रीय शाकाहारी संघाचाही पाठिंबा मिळाला. आणि आज जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
शाकाहारी अन्न म्हणजे फक्त झाडपाला मानला जातो. शरीरात तरतरी यायची असेल तर नाॅनव्हेज पाहिजेच अस म्हणणारा वर्ग वेगळा आहे. पण शाकाहरी अन्नातून तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळू शकते इतकी प्रथिने मिळताता. कोरोनानंतर आरोग्य हेल्दी राहण्यासाठी अनेकांना आपला मोर्चा शाकाहरीकडे वळवला. मात्र अजूनही प्रथिने मिळण्यासाठी चिकन, अंडी याला प्राधान्य दिले जाते. तुम्हाला हीच प्रथिने शाकाहरी अन्नातून मिळतात. नेमके कोणते पदार्थ हे जाणून घेऊया.
कॉर्न
भारतात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या धान्याचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार प्रत्येक १०० ग्रॅम कॉर्नमध्ये ३३.३ ग्रॅम प्रोटीन असते. जे तुमचे स्नायू तयार करण्याचे काम करते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यात फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसते. तुम्ही कॉर्न उकळून, भाजून किंवा इतर कोणत्याही डिशमध्ये घालून खाऊ शकता.
मटार
मटारची भाजी हिवाळ्यात जादा विक्रिस बाजारात येते. देशात याचे चांगले उत्पादन होते. मटारचे छोटे हिरवे दाणे हे प्रथिनासारख्या अनेक पोषक तत्वांचे भांडार आहेत. मटारच्या पूर्ण कपमध्ये सुमारे ९ ग्रॅम प्रथिने असतात. याव्यतिरिक्त जीवनसत्त्वे ए, के आणि सी भरपूर प्रमाणात असतात. यात अनेक खनिजे आणि उच्च प्रमाणात फायबर देखील असतात.
हरभरा
हरभरा लोह, कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. हॉपकिन्समेडिसिनच्या अहवालानुसार, पाव कप हरभऱ्या मध्ये सुमारे ७.३ ग्रॅम प्रोटीन आढळते. इतकंच नाही तर चणे तुमच्या दैनंदिन गरजेच्या ४० टक्के फायबर, ७० टक्के फोलेट आणि २२ टक्के लोह देखील पुरवतात. याव्यतिरिक्त रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
बीन्स
बीन्समध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. राजमा हा भारतीयांचा आवडता पदार्थ आहे. जो पौष्टिक अन्न घटकामध्ये मोडतो. राजमा उकडूनही खाऊ शकता. पाव कप राजमामध्ये ७.५ ग्रॅम प्रथिने मिळतात.
मसूर
महाराष्ट्रात तूर, उडीद किंवा मूग डाळीचा समावेश हा दररोजच्या आहारात असतोच. मसूर हे प्रथिने, फायबर आणि आवश्यक खनिजांचे सेवन वाढवण्याचा एक सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. पूर्ण जेवणासाठी भात किंवा रोटी बरोबर सर्व्ह करा.
चीज
शाकाहारी लोकांसाठी पनीर हे त्यांचे चिकन आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिळतात. पनीरचा फायदा म्हणजे याने पोट भरते शिवाय चरबी जाळण्यास याची मदत होते. पनीर कच्चे आणि भाजी म्हणून शिजवूनही खाता येते. पाव कप पनीरमध्ये तुम्हाला १४ ग्रॅम प्रथिने मिळतात.
Disclaimer: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Previous Articleगुप्तधनाच्या लालसेपोटी कोल्हापुरातील महिलेचा खून ; संशयिताला अटक
Next Article शिंदे-फडणवीस सरकार असंवेदनशील-सुप्रिया सुळे
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.