वर्ल्ड टेलिकॉम डे ( World telecom day ) किंवा जागतिक दूरसंचार दिन दरवर्षी 17 मे ‘ला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या मोबाईल, इंटरनेट ही लोकांची प्राथमिक गरज बनली आहे. व्यावसायिक जीवनात सुद्धा याचे खूप महत्त्व आहे.
आजकाल आपण काही सेकंदातच आपल्या मित्रांशी ,कुटुंबियांशी, नातेवाईकांशी सहज बोलू शकतो. हे दूरसंचार क्रांतीमुळे शक्य झाले आहे. या प्रगतीमुळे भारताची गणना विकसनशील देशांमध्ये होत आहे.
दूरसंचार म्हणजे काय ?
केबल, टेलिग्राफ, टेलिफोन आणि ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून होणाऱ्या संवादाला दूरसंचार म्हणतात.
केव्हापासून झाली जागतिक दूरसंचार दिनाला ?
जागतिक दूरसंचार दिनाची सुरुवात 17 मे 1865 पासून झाली. याची सुरुवात 1969 पासून झाली तेव्हा पासून सम्पूर्ण जगभरात हा दिवस उत्साहाने साजरा होतो. नोव्हेंबर 2006 मध्ये तुर्की मध्ये पूर्ण झालेल्या परिषदेत जागतिक दूरसंचार आणि माहिती आणि सोसायटी हे तिन्ही एकत्रितपणे साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जागतिक दूरसंचार दिन 2022 थीम । World telecom day 2022 theme
यंदाच्या जागतिक दूरसंचार दिनाही थीम वृद्ध व्यक्ती आणि निरोगी व्यक्तींसाठी डिजिटल तंत्रज्ञान ( Digital Technologies For Older Persons And Healthy Ageing ) अशी आहे. मागील वर्षी आव्हानात्मक काळात परिवर्तन अशी थीम ठेवण्यात आली होती.