वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या विश्व सुपर कबड्डी लीग स्पर्धेला आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने अधिकृत मान्यता दिली आहे. सदर स्पर्धा साऊथइस्ट आशियाई कबड्डी फेडरेशन आणि थायलंड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त सहकार्याने होणार आहे.
आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने या स्पर्धेला अधिकृत मान्यता देवून कबड्डीया क्रीडा प्रकाराच्या दर्जा वाढविण्याला हातभार लावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. गेल्या ऑगस्टमध्ये साऊथइस्ट आशियाई कबड्डी फेडरेशनने एस. जे. अपलिफ्ट कबड्डी प्रा.ली. संस्थेला येत्या 15 वर्षांच्या कालावधीसाठी विश्व सुपरलीग कबड्डी स्पर्धा भरविण्यासाठी पूर्ण हक्क दिले आहेत. विदेशात कबड्डीचा प्रसार होण्याच्या दृष्टिने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले









