प्रतिनिधी/ बेळगाव
एसकेई सोसायटीच्या आरपीडी पीयू कॉलेजचा कला आणि वाणिज्य विभाग बेळगाव येथे 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्या समस्या, लोकसंख्येचे परिणाम, लिंग समानता, जगातील लोकांचे आरोग्य आणि शिक्षण याबद्दल जागरुकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा हेतू होता. प्रा. मंजुनाथ दो•ामणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी कॉलेजचे प्रा. डॉ. अभय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उत्पादक आणि अनुत्पादन लोकसंख्या, लोकसंख्या वाढ का होते याबद्दल माहिती दिली. पीयू कॉलेजच्या प्रा. तृप्ती शिंदे, प्रा. राधिका कोणी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मंजुनाथ दो•ामणे यांनी केले.









