कृष्णात पुरेकर,कोल्हापूर
World Liver Day 2023 : महाविद्यालयीन विश्वात उत्सुकता म्हणून घेतलेला पेग नंतर व्यसन बनले.. अन् त्याचा परिणाम शरीरावर होऊ लागला. त्यातून लिव्हर डिसीज अन् अंतीम टप्प्यात लिव्हर फेल्युअर… जिल्ह्यात दाखल होणाऱ्या लिव्हरशी निगडीत तीन रूग्णांपैकी एक अल्कोहोलिक आहे. अन् हे रूग्ण 20 ते 40 वयोगटातील आहेत. व्यसनाधिनतेतून तरूणाई लिव्हर डिसीजची शिकार बनत आहे. बुधवारी 19 एप्रिल रोजी ‘वर्ल्ड लिव्हर डे’ अर्थात यकृत दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यसनाधिनतेमुळे होणारे वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक नुकसानीवर जागृती आवश्यक आहे.
शरीरातील केमिकल फॅक्टरीचे काम यकृताकडे
शरीरात यकृत अर्थात लिव्हर हा सर्वात मोठा अवयव आहे. शरीराच्या एकूण वजनाच्या दीडशे ग्रॅम इतके यकृत असते. शरीराच्या उजव्या बाजूस बरगड्यांमध्ये त्याची रचना असते. चयापचयाच्या सर्व क्रियांत त्याचा महत्वाचा वाटा असल्याने त्याला शरिराची केमिकल फॅक्टरी म्हणतात. कारण पाचशेहून अधिक कार्य यकृत करत असते. यकृताला संसर्ग झाल्यास शरीरात अंतर्गत गुतांगुंत वाढत जाते, अन् आरोग्य धोक्यात येते. म्हणूनच लिव्हरला संसर्ग अधिक गांभिर्याने घेतला जातो. बिघडलेले यकृत शरीराचा डोलारा पूर्णपणे सावरू शकते, पण मुत्रपिंड, मेंदू, फुफ्फुसे, रक्ताभिसरण प्रक्रियेवर ते परिणाम करू शकते.
लिव्हर डिसीजशी निगडीत लक्षणे
यकृताच्या आजारात कावीळ, पोटात पाणी होणे, रक्ताच्या उलट्या, मळमळ, भूक मंदावणे, शरीरावर सुज, थकवा, वजन घटणे, मेंदूला सुज, निद्रानाश, ग्लानी, बेशुद्धावस्था, शरीराला खाज सुटणे, ताप, उजव्या बरगडीखाली वेदना, त्वचा कोरडी पडणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, ही लक्षणे आहेत. यकृताचा आजार हे मानवी मृत्यूतील एक प्रमुख कारण आहे. चयापचयाची महत्वपुर्ण क्रिया यकृतावर अवलंबून असल्याने ती बिघडली तर सामान्य लक्षणही लिव्हर डॅमेजला कारणीभूत ठरू शकते.
यकृताशी निगडीत आजार
यात प्रामुख्याने कावीळ ए.,बी.,सी.,ई. तसेच अल्कोहोलिक डिसीज, क्रॉनिक डिसीज, ड्रगशी निगडीत इंज्युरी, फॅटी लिव्हर डिसीजचा समावेश आहे. भारतात अतिमद्यपानातून लिव्हर डिसीज अ्न लिव्हर फेल्युअरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी 2018 मध्ये बनवलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाची 2021 मध्ये अंमलबजावणी सुरू झाली. दरम्यानच्या काळात कोरोना साथीत 46 टक्के कोरोना रूग्णात लिव्हरशी निगडीत संसर्ग दिसला. देशात लिव्हर डॅमेजने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सव्वातीन टक्के आहे.
गोव्यानंतर लिव्हर डिसीजच्या रूग्णांत कोल्हापूरचा क्रमांक लागतो. याला कारण ठरलीय व्यसनाधीनता. अतिमद्यपान अर्थात अल्कोहोलिकचा लिव्हरवर होणारा परिणाम रूग्णांना मृत्यूपर्यत घेऊन जात आहे. जिल्ह्यात लिव्हरशी निगडीत दाखल होणाऱ्या तीनपैकी एक रूग्ण अल्कोहोलिक आहे. त्यातही असे रूग्ण 20 ते 40 वयोगटातील अधिक आहेत. बदलती जीवनशैली, स्थुलत्व, व्यायामाचा अभाव आणि अतिमद्यपान याला कारणीभुत आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या लिव्हरशी निगडीत रूग्णांत तरूणांचे प्रमाण अधिक आहे. यातही मद्यपानाशी निगडीत तरूण अधिक आहेत. त्यांच्यात दिसणाऱ्या या डिसीजमुळे रूग्णांचे वैयक्तिक नुकसान होत आहेच. शिवाय कुटुबांचे आर्थिक, सामाजिक नुकसानही होत आहे. तरूणाईत वाढत असलेले लिव्हर डिसीज नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक असल्याची माहिती सीपीआरमधील मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. आश्विनकुमार बनसोडे यांनी दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









