नवी दिल्ली : होस्टन येथे होणाऱ्या विश्व कनिष्टांच्या सांघिक स्क्वॅश चॅम्पियनशीप स्पर्धेत शौर्या बावा आणि अनाहत सिंग यांच्यावर भारतीय संघाची मदार राहिल. अलिकडेच शौर्या बावाने एकेरीत कास्यपदक मिळविले होते. आता पोस्टलमधील स्पर्धेत मुलांच्या विभागात बावा आणि युवराज वाधवानी हे एकत्र खेळतील. मुलांच्या विभागातील सामन्यांना येथे गुरूवारी उशीरा प्रारंभ होत आहे. मुलींच्या विभागातील भारताची राष्ट्रीय विजेती अनाहत सिंग आणि उनाती त्रिपाठी त्याच प्रमाणे निरुपमा दुबे व शमिना रियाज हे दुहेरीत एकत्रित खेळतील. पहिल्या फेरीमध्ये मुलांच्या विभागात भारताचा सामना कुवेतबरोबर तर मुलींच्या विभागात भारताचा सलामीचा सामना चीन तैपेईशी होणार आहे.










