World Heritage Week : सौरभ मुजुमदार,कोल्हापूर कोल्हापूर वस्तुसंग्रहालयातील एक स्वतंत्र व नाविण्यपूर्ण दालन म्हणजे शस्त्रास्त्र दालन होय.वेगवेगळ्या भौगोलिक भागात वेगवेगळ्या राजसत्ता,स्वतंत्र संस्थाने,सहाजिकच राज्यविस्तारस लढाई व युद्ध होत.अनेक युद्धांमध्ये वापर होणारी शस्त्रे जुन्या आठवणींसह या दालनात योग्य पद्धतीने मांडणी केलेली आपणास पहावयास मिळतात.इ.स. 1955 ला कागल, निपाणी, नाशिक, सावंतवाडी, अलाहाबाद ऑर्डीनन्स डेपो इत्यादीं सह अनेक ठिकाणाहून मिळालेल्या शस्त्रांमध्ये तलवारी, तोफा, बंदुका, जुनी पिस्तुले, भाले, चिलखत, शिरस्त्राणे यांसह अनेक शस्त्रेआहेत.
काळविटाच्या शिंगाचे हत्यार
नाशिक मधील एका भिंतीत सापडलेल्या या हत्याराची लांबी 91 सेमी व मध्यभागी एक पोलादी वलय आहे.दोन्ही बाजूस काळवीटाची शिंगे असून त्याच्या टोकाला पोलादी तीक्ष्ण सुळे आहेत. मराठा काळात वापरणारे हे शस्त्र वस्तुसंग्रहालयास उच्च स्थानावरच घेऊन जाते.सावंतवाडी येथे मिळालेले गुप्ती हे हत्यार धारदार असून लाकडी मुठीसह गोलाकार नक्षीकाम आहे.
इ.स.1939 च्या जागतिक महायुध्दात वापरलेल्या जर्मन सैनिकांच्या सावंतवाडी येथे सापडलेल्या सहा बंदुका या दालनात आहेत.इतर बंदुका ब्रिटिश राजवटीतील आहेत.तीन बंदुका सर्वात जुन्या असून मराठाकालीन असाव्यात.दोन बंदुकांची तोंडे रुंद असून एकाचे पितळी व दुसरे पोलादी आहे. कदाचित हत्ती अथवा उंटावरून त्याचा वापर केला जात असावा. तिस्रया चिंचोळे तोंडाच्या बंदुकीच्या अग्रभागी सोनेरी नक्षीकाम आहे.प्रत्यक्ष शस्त्रे पाहणे हा अनुभव लाख मोलाचाच असतो.
अत्यंत आकर्षक कलाकुसर रेखीव पाती व नक्षीदार मुठी असणाऱ्या तलवारी या दालनात आहेत.संस्थांच्या लवाजम्यात तलवारधारी सैनिकांना मानाचे स्थान असते.राजवैभवाचे,महान योद्धाचे,तर धाडसी बलवान पराक्रमाचे प्रतीक म्हणून पुरातन काळापासून तलवार या आयुधाला सर्वोच्च स्थान आहे. काही तलवारींवर सोन्याच्या मुलामाचे काम काहींवर उंट, हत्ती , घोडे यांच्या प्रतिकृती तर फुलांचे , पक्षांचे नक्षीकाम आहे. निरनिराळ्या पात्यांच्या आकारातील लांबी, रुंदीच्या विविध तलवारी आहेत. मोगल परदेशी बनावटींसह सुसज्ज तलवारींच्या शस्त्रांचे दालन उल्लेखनीय आहे.
इ.स .1914 ला पहिल्या महायुद्धात जर्मन सैनिकांनी वापरलेली शिरस्त्राणे असून आतील बाजूस व स्वसंरक्षणासाठी कापसाच्या लहान लहान गाद्या आहेत. याच सैनिकांनी वापरलेल्या मशीनगन्स पाहिल्यास तर आपणास त्या काळातच घेऊन जातात. विळे, खंजीर, सुरे, भाले,व ढालींवर तर वाघ,सिंह हरणे यांसह कलाकृती असलेल्या शिवाय काही ढाली कासवाच्या पाठीच्या असून त्यावर फुला पानांचे सुंदर नक्षीकाम आहे.तोफांचा समावेश या संग्रहालयात असून एका तोफेवर 1609 हे सालदर्शक आहे.लॅटिन भाषेतील चार आकडा, दोन घोड्यांच्या रथात कोरलेली ग्रीक युद्धदेवता,सिंह व कोंबडा यासह विविध कलाकृती असणारी ही तोफ दर्शनी भागातच ठेवलेली आहे. कागल येथे आढळलेल्या दुसऱ्या तोफेंसह दोन लहान तोफाही आहेत.उत्कृष्ट नक्षीकामाची पितळ धातूची तोफ सर्वांना आकर्षित करते. भारतीय संस्कृतीत शस्त्रे,आयुधे ही एका उच्च वैभवाचे , संपन्नतेचे प्रतिकच असून आजही यांचे पूजन केले जाते. आपली संस्कृती, इतिहास, वारसा परंपरा समृद्धी यांची आठवण करून देणारे हे शस्त्रास्त्र दालनास कोल्हापूरच्या वैभवात मानाचे स्थान आहे.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा-
World Heritage Week :कोल्हापूरच्या चिरंतन स्मृतींचे चित्रदालन
World Heritage Week : सातवाहनकालीन कोल्हापूरचा इतिहास
World Heritage Week : जागतिक वारसा जपणारे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय
दाट वृक्षांच्या सावलीत आजही इतिहासाची साक्ष देतेय कोल्हापुरातील ‘ही’ वास्तू
Previous Articleलैंगिक अत्याचार प्रकरणी संशयिताला अटक
Next Article पणजीत वाहतूक कोंडी वाढली !









