प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिवस मोठया उत्साहात साजरा केला जातो. लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे. हा यामागील उद्देश असतो. हा दिवस साजरा करताना प्रत्येक वर्षी एक थीम ठरवली जात असते व त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
संयुक्त राष्ट्राने १९७२ पासून ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतात.
जागतिक पर्यावरण दिनाची थीम :
यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ‘Only One Earth’ अशी आहे. 2021 साठी Ecosystem Restoration म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं ही खास थीम ठेवण्यात आली होती.
पर्यावरणाविषयी जनजागृती होण्यासाठी व पृथ्वीवर स्वच्छता ठेवण्यासाठी लोकांना प्रेरीत करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो.