शहर-ग्रामीण भागातील डॉक्टरांचा सन्मान : डॉक्टर-सीए समाजाचे महत्त्वाचे घटक : कर्तव्य मानून सत्काराचे आयोजन
बेळगाव
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय मेडिकल विंगच्यावतीने जागतिक डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी शहर आणि ग्रामीण भागातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. मुख्य संचालक बी. के. साधना बहनजी यांनी अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट केले. शिवाय उपस्थित डॉक्टरांचा गौरव केला. याप्रसंगी डॉ. व्ही. जी. गोवेकर, डॉ. वंदना जोगळेकर, डॉ. जगदीश गौडापाटील, डॉ. राजशेखर कुंडगी, डॉ. विनोद कडोली, डॉ. नेहा मालजी, डॉ. तेजस्विनी होंगल यांच्यासह अन्य डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. बी. के. मोहीनी बहननी स्वागत केले.
जायंट्स परिवारतर्फे सीए दिन
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे चार्टर्ड अकौंटंट्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी सीए राजेंद्र मुंदडा यांचा शाल, श्रीफळ, पुष्प, भेटवस्तु व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. फेडरेशनचे माजी अध्यक्ष राजू माळवदे यांनी जायंट्सच्या कार्याची माहिती करून दिली. राजेंद्र मुंदडा 1989 पासून सीए म्हणून उत्तम काम करत असल्याचे सांगितले. यावेळी फेडरेशनचे सचिव प्रवीण त्रिवेदी, अध्यक्ष किरण वेसणे व उपाध्यक्ष विजय खोत उपस्थित होते.
प्राईड सहेलीतर्फे डॉक्टर्स डे-सीए डे
प्राईड सहेलीतर्फे डॉक्टर्स डे आणि सीए डेचे औचित्य साधून सीए विलास डोंगरे व भूलतज्ञ डॉ. शिवानी अनगोळकर यांचा सत्कार गुऊवारपेठ टिळकवाडी येथे करण्यात आला. डॉक्टर आणि सीए समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार करणे आपले कर्तव्य आहे, असे मत प्राईड सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा यांनी मांडले. या कार्यक्रमाला सचिव जिग्ना शहा, रूपा मंगावती आदी सदस्या उपस्थित होत्या.









