वृत्तसंस्था /मुंबई
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून एकूण 9 सामन्यांमध्ये बदल करण्यात आला असून यात भारताच्या 2 सामन्यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज लढत 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. बुधवार, 9 ऑगस्ट रोजी, आयसीसीने सुधारित वेळापत्रक जारी केल्यानंतर लगेचच तिकिटांसंदर्भात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील तिकीट विक्रीचा प्रारंभ 25 ऑगस्टपासून केला जाणार आहे. आयसीसीने म्हटले आहे की, ‘चाहते तिकीट विक्री सुरू होण्यापूर्वी 15 ऑगस्टपासून प्ttज्s://www.म्rग्म्वैदत्dम्ल्ज्.म्दस्/rाgग्stाr येथे नोंदणी करु शकतात. 25 ऑगस्टपासून बिगर भारतीय सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरु होणार आहे. भारताच्या सामन्यांची तिकिटे 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध असतील, तर सेमीफायनल आणि फायनलची तिकिटे 15 सप्टेंबरपासून खरेदी करता येतील, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट उपलब्ध असणार आहे. आयसीसी वेबसाईटशिवाय 7-8 माध्यमातून ऑफलाईन तिकीट उपलब्ध असणार आहेत. तसेच जे चाहते ऑनलाईन तिकीट बूक करतील, त्यांना स्टेडियममध्ये तिकीटाची प्रिंट सोबत ठेवणे बंधनकारक असेल, असेही शाह यांनी सांगितलं.









