ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. 10 देशांमध्ये 48 सामने खेळवले जाणार आहेत.
या स्पर्धेतील सामने हैदराबाद, धर्मशाळा, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद या ठिकाणी असणार आहेत. पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर अंतिम सामना अहमदाबादच्या मैदानावर रंगणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. प्रत्येक संघ राऊंड फॉरमॅटमध्ये इतर 9 संघांशी खेळेल. ज्यात अव्वल चार संघ बाद फेरी आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
दरम्यान, या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा आस्वाद घेण्याची पुणेकरांना 5 दिवस संधी मिळणार आहे. पुण्यातील गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्डकपमधील 5 सामने खेळण्यात येणार आहेत. यात भारत आणि बांगलादेश या सामन्याचा देखील समावेश आहे. 19 ऑक्टोबरला भारत वि. बांग्लादेश, 30 ऑक्टोबर – अफगाणिस्तान वि. क्वालिफायर 2, 1 नोव्हेंबर – न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका, 8 नोव्हेंबर – इंग्लंड वि. क्वालिफायर 1, 12 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. बांग्लादेश
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळूर









