वृत्तसंस्था/ हरारे
2023 साली ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी झिंबाब्वेत सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतील सहापैकी दोन संघांना तिकीट मिळणार आहे.
झिंबाब्वेत सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत यजमान झिंबाब्वेने चार सामन्यातून 8 गुणासह पहिले स्थान मिळवले आहे. झिंबाब्वेने आपले चारही सामने जिंकलेले आहेत. विंडीज संघाने 4 सामन्यातून 2 सामने जिंकले असून दोन सामने गमवत केवळ चार गुण मिळवले आहेत. नेंदरलँड्सने 4 पैकी तीन सामने जिंकत 6 गुण नेंदवले आहेत. अ गटातून झिंबाब्वे पहिल्या, नेदरलँड्स दुसऱ्या तर विंडीज तिसऱ्या स्थानावर आहे. ब गटातून श्रीलंकाने आपले चारही सामने जिंकत 8 गुणासह आघाडीचे स्थान मिळवले आहे. या गटातून ओमानने 4 गुण नोंदवताना दोन सामने जिंकले असून दोन सामने गमवले आहेत. स्कॉटलंडने या गटात दुसरे स्थान मिळवताना 4 पैकी 3 सामने जिंकून सहा गुण नोंदवले आहेत. आता या पात्र फेरीच्या स्पर्धेत सुपर सिक्स फेरीमध्ये झिंबाब्वे आणि लंका हे दोन संघ प्रत्येकी चार गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. स्कॉटलंड आणि नेदरलँड्स हे संघ पुढील फेरीसाठी त्यांना दोन गुण मिळतील. चार संघ ज्यांनी सुपर सिक्स फेरी गाठलेली नाही ते संघ झिंबाब्वे प्ले ऑफ सामन्यात खेळतील.
सुपर सिक्स फेरी
गुरुवार 29 जून झिंबाब्वे वि. ओमान, शुक्रवार 30 जून लंका वि. नेदरलँड्स, प्ले ऑफ सामना आयर्लंड वि. अमेरिका, शनिवार 1 जुलै स्कॉटलंड वि. विंडीज, रविवार 2 जुलै झिंबाब्वे वि. श्रीलंका, प्लेऑफ सामना नेपाळ वि. युएई, सोमवार दि. 3 जुलै नेदरलँड्स वि. ओमान, मंगळवार दि. 4 जुलै झिंबाब्वे वि. स्कॉटलंड, प्ले ऑफ सामना सातव्या आणि आठव्या स्थानावरील संघात, बुधवार दि. 5 जुलै विंडीज वि. ओमान, गुरुवार दि. 6 जुलै स्कॉटलंड वि. नेदरलँड्स, प्लेऑफ सामना नवव्या आणि दहाव्या क्रमांकावरील संघात, शुक्रवारी 7 जुलै लंका वि. विंडीज, रविवार दि. 9 जुलै अंतिम सामना.









