तेल संघटना ओपेक यांच्याकडून अंदाज व्यक्त
व्हिएन्ना
चालू वर्षात कच्च्या तेलाची जागतिक पातळीवरील विक्रीसह अन्य घटकासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे महागाईचा भडका उडाला असल्याचेही पेट्रोलियम निर्यात देशांची संघटना ओपेक यांनी सांगितले आहे. ओपेकच्या मासिक अहवालामधून दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2022 दरम्यान संपूर्ण जगात दररोज 36.7 लाख कच्च्या तेलाच्या बॅरेलची मागणी राहणार असून हा आकडा मागील अंदाजापेक्षा 4.80 लाख बॅरेलने कमी राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
याचदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वधारुन 139 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या होत्या. 2008 नंतर कच्च्या तेलाचा हा स्तर इतक्या उंचीवर कधी गेला नव्हता.
ओपेक संघटना ः सदरच्या संघटनेमध्ये आताच्या घडीला अल्जीरिया, अंगोला, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, इराण, इराक, कुवैत, लीबिया, नायझेरिया, कांगो, सौदीअरब, संयुक्त अरब अमीरात आणि व्हेनेझुएलासह 13 देश सदस्य आहेत.
ओपेक देशांवर भारत कितपत अवलंबून?
भारत आपली तेलाची गरज पूर्ण करण्यासाठी जवळपास 80 टक्के कच्चे तेल आयात करत आहे. यामध्ये चीन 50 टक्के आणि दक्षिण कोरिया, जपान 100 टक्के कच्च्या तेलाची आयात करत आहे. जगात कच्च्या तेलाचे 12 टक्के उत्पादन हे रशियात, 12 टक्के सौदी अरब आणि 16 ते 18 टक्के उत्पादन अमेरिकेत होते.









