प्रतिनिधी/ बर्लिन
नॉर्वेजियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनला सोमवारी जगभरातील 1 लाख 43 हजारांहून अधिक लोकांनी एका विक्रमी सामन्यात त्याच्याविऊद्ध खेळताना बरोबरीत लढत सोडविण्यास भाग पाडले.
मॅग्नस कार्लसन विऊद्ध जग म्हणून ओळखला गेलेला हा ऑनलाइन सामना 4 एप्रिल रोजी जगातील सर्वांत मोठी बुद्धिबळ वेबसाइट ‘चेस डॉट कॉम’वर सुरू झाला आणि ही अशी पहिलीच ऑनलाइन फ्रीस्टाइल गेम होती ज्यामध्ये विश्वविजेत्याचा समावेश राहिला. टीम वर्ल्डने कार्लसनच्या राजाला तिसऱ्यांदा चेक दिल्यानंतर ही महालढत संपली. ‘चेस डॉट कॉम’ने कार्लसन मोठ्या फरकाने जिंकेल असे भाकित केल्यानंतर लागलेला हा एक आश्चर्यकारक निकाल होता. टीम वर्ल्डने प्रत्येक चालीवर कौल दिला आणि प्रत्येक संघाला त्याचा खेळ करण्यासाठी 24 तास मिळाले. कार्लसन पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळला.
34 वर्षीय कार्लसन 2010 मध्ये 19 व्या वर्षी जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनला आणि त्याने पाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याने 2014 मध्ये 2882 चे सर्वोच्च बुद्धिबळ रेटिंग मिळवले आणि एका दशकाहून अधिक काळ तो निर्विवादपणे जगात अव्वल क्रमांकावर राहिला आहे. हा एक फ्रीस्टाइल सामना होता, त्यामुळे उंट, घोडे, हत्ती, राणी, राजा यांना पटावर मिळेल तिथे ठेवले गेले, तर प्यादी त्यांच्या नेहमीच्या जागी राहिली. फ्रीस्टाईल बुद्धिबळ हा खूप लोकप्रिय प्रकार आहे कारण तो खेळाडूंना अधिक सर्जनशील बनायला लावतो.
हा तिसरा जग विरुद्ध खेळाडू अशा प्रकारचा विक्रमी ऑनलाइन सामना होता. 1999 मध्ये रशियन ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोव्ह मायक्रोसॉफ्ट नेटवर्कवर 50,000 हून अधिक लोकांविऊद्ध खेळला होता आणि चार महिन्यांनंतर जिंकला होता. गेल्या वर्षी भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद ‘चेस डॉट कॉम’वर जवळजवळ 70,000 खेळाडूंविऊद्ध लढला होता आणि तो सामना त्याने जिंकला होता. या आठवड्यात ‘चेस डॉट कॉम’च्या व्हर्च्युअल चॅटमध्ये खेळाडूंमध्ये बरोबरी साधून गौरव मिळवायचा की, जरी शेवटी पराभव झाला, तरी कार्लसनविऊद्ध खेळत राहायचे यावरून मतभेद निर्माण झाल्याचे दिसले होते.









