भारताच्या 19 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाने क्रिकेटची जननी असलेल्या इंग्लंडच्या मुलींच्या संघाला दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या टी 20 स्पर्धेत पराभूत करून विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या अभूतपूर्व यशाने एका रात्रीत या मुली भारतीयांच्या आयडॉल बनल्या आहेत. पण यातील प्रत्येकीचा व्यक्तिगत सामना आपापल्या परिस्थितीशी होता. त्यावर मात करत त्यांनी केलेली ही कामगिरी त्यामुळेच मोठी चमकदार आहे. मुलींच्या भारतीय संघाने प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाला केवळ 68 धावांवर रोखून निर्धारित लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 14 षटकांत गाठलं. गेल्या वषी 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने इंग्लंडलाच पराभूत करून जगज्जेतेपद पटकावले होते. सातत्याने मुलांचा संघ यशस्वी होत होता. 2000, 2008, 2012, 2018, 2022 असे अनेकदा युवक संघाने आपले कसब दाखवले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी वरि÷ संघाची द्वारे आपोआप खोलली गेली. यापूर्वी 19 वर्षाखालील गटातून आलेल्या मोहम्मद कैफ, युवराज सिंग, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, पृथ्वी शॉ आणि शुभमन गील या युवकांनी आपल्या खेळातून सिलेक्टर्सचे लक्ष वेधले होते. आता राहिलेली कसर मुलींच्या संघाने भरून काढत दोन्ही विभागातील जगज्जेतेत्व पदाक्रांत केले आहे. गेल्या काही वर्षांपासून वरि÷ांचा क्रिकेट संघ जज्जेतेपदासाठी पुन्हा धडका देत आहे. मात्र यश त्यांना सातत्याने हुलकावणी देत आहे. अशा काळात 19 वर्षाखालील मुला-मुलींनी मिळवलेले यश त्यांच्याहून थोरांना प्रेरणा देणारे आहे. आपल्या मागून येणाऱया पिढीतील मुले ज्या पद्धतीने यश मिळवत आहेत, ते पाहून वरि÷ गटातील खेळाडू सकारात्मकतेने आपले योगदान देतील, अशी आशा करायला हरकत नाही. या युवा भारतीय महिला संघाचे आता संपूर्ण भारतभरात प्रचंड कौतुक होत आहे. भारताच्या वरि÷ राष्ट्रीय महिला संघाचा कणा असलेली धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने या जगज्जेत्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. श्वेता सहरावतने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. सर्वाधिक विकेट पटकावणाऱयांच्या यादीत पार्शवी चोप्रा नऊ विकेटसह चौथ्या स्थानी आहे. विजयानंतर कर्णधार शफाली वर्मा तिरंगा पांघरून मैदानाची फेरी काढताना चित्र आता देशभर प्रसिद्ध झाले आहे. एका दिवसात संपूर्ण देशात तिच्या नावाचे कौतुक होत आहे. यापूर्वी रन मशीन म्हणून ओळखली जाणारी आणि जागतिक क्रमवारीत अव्वल ठरलेली स्मृती मानधना जशी लोकप्रिय झाली त्याहून अधिकची लोकप्रियता या यशाने शफालीच्या वाटय़ाला येणार आहे. चार वर्षांपूर्वी वयाच्या पंधराव्या वषी तिने भारतासाठी खेळण्यास पदार्पण केले आणि सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा गाठणारी ही सगळय़ात लहान वयाची खेळाडू आहे. 2021 मध्ये कसोटी पदार्पणात 96 धावांची खेळी केली होती. शनिवारी झालेल्या वाढदिवसाची भेट म्हणून आपल्याला विश्वचषक हवा हा तिचा आग्रह संपूर्ण संघाने पूर्ण केला आहे. बहिणीला खेळताना पाहून क्रिकेटची आवड निर्माण झालेल्या श्वेता सेहरावतला लहानपणी चार वर्षे मुलांबरोबरच खेळावे लागले. त्यामुळे तिची भीती कायमची निघून गेली. या स्पर्धेत सहा सामन्यात तीन अर्धशतकांसह 292 धावा तिने केल्या. फिरकी गोलंदाज पार्श्वाr चोप्रा ही क्रिकेटपटू घराण्यातून आलेली उत्तर प्रदेशची खेळाडू. एका सामन्यात ओठाला चेंडू लागून दुखापत झाली असतानाही विश्रांतीचा सल्ला मागे टाकून मैदानात उतरली होती. याच राज्यातील उन्नावची अर्चना देवी ही पिता आणि बंधूंच्या मृत्यू पश्चात आईने दूध विकून मोठी केलेली मुलगी आहे. याच राज्यातील प्रयागराजची फलक नाज. तिच्या कुटुंबीयांना प्रशिक्षणाचे पैसेही भागवणे शक्मय नव्हते. मात्र अजय यादव यांनी तिला मोफत शिकवून पक्के तयार केले. मुंबईतील हर्ले गाला ही पायाला दुखापत झाली म्हणून स्केटिंग सोडून क्रिकेटमध्ये आली आणि यंदाच्या फायनलमध्ये तिच्या दमदार खेळाने विजय सुकर झाला. बंगालच्या सिलिगुडीची रिचा घोष जेव्हा खेळायला लागली तेव्हा क्रिकेट खेळणारी ती तिथली एकमेव मुलगी होती. आक्रमक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी सोबतीला विकेट कीपिंग या तिच्या वैशिष्टाने ती या संघाचा अविभाज्य भाग बनली. सोनिया मेंढिया ही हरियाणाच्या रोहतक मधली खेळाडू भावाच्या प्रोत्साहनाने क्रिकेटमध्ये उतरली. फिरकीपटू आणि मधल्या फळीतील फलंदाज ही तिची ओळख बनली आहे. पंजाबच्या पतियाळामधील मन्नत कश्यप मुलींच्या प्रशिक्षणासाठी सोयी सुविधा नसताना मुलांबरोबर खेळली. बंगालची तितास साधू ही वेगवान गोलंदाज. अंतिम सामन्यात तिने चमत्कार दाखवला. वेग आणि अचूकता हेच विशाखापट्टणमची क्रिकेटर शबनम एमडीचे सुद्धा वैशिष्टय़ आहे. भोपाळची सौम्या तिवारी आणि हैदराबादची गोंगाडी त्रिशा किंवा फिरोजाबादची सर्वात लहान पंधरा वर्षे वयाची सोनम यादव या सर्व मुलींनी जगज्जेते पदासह भारतीय मुलींसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या कौतुकात मात्र बीसीसीआयकडून फारच कंजूषी झाल्याचे दिसून येत आहे. या मुली लवकरच वरि÷ भारतीय संघात खेळताना दिसतील. यापुढच्या प्रत्येक स्पर्धेत अशाच यशस्वी होतील याच त्यांना शुभेच्छा.
Previous Articleउत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमस्खलन; दिल्लीत थंडीची लाट
Next Article टी-20 विश्वचषक संघात भारताच्या तिघींना स्थान
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








