शानभाग-भंडारी शाळांच्यावतीने आयोजन : विद्यार्थ्यांकडून घोषणा
बेळगाव : एसकेई सोसायटी संचालित व्ही. एम. शानभाग मराठी शाळा व एम. आर.भंडारी कन्नड शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जागतिक सायकल दिन रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाग्यनगर क्षेत्रामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सायकल घेऊन घोषणा देत सायकल चालवा, इंधन वाचवा, सायकल चालवा, निरोगी रहा, अशा अनेक घोषणांनी सायकलचे महत्त्व फलक माध्यमातून प्रसिद्ध केले. यावेळी मुख्याध्यापिका गायत्री शिंदे, सावित्री नायक, पी. एस. खनगावकर, वैजनाथ मठ व इतर शिक्षक उपस्थित होते.









