सिंधू, सात्विकसाईराज – चिराग यांना पहिल्या फेरीत पुढे चाल
वृत्तसंस्था /क्वालालंपूर
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि पुऊष दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रान्कीरे•ाr व चिराग शेट्टी यांना गुऊवारी जाहीर करण्यात आलेल्या ‘बीएफडब्ल्यू’ जागतिक स्पर्धेच्या ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. 21 ते 27 ऑगस्टदरम्यान कोपनहेगन, डेन्मार्क येथे ही स्पर्धा होणार आहे. 2019 मध्ये महिला एकेरीचे विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या सिंधूच्या वाट्याला कठीण ड्रॉ आला आहे आणि तिचा सामना थायलंडच्या रत्चानोक इंतानोन आणि अव्वल मानांकित कोरियाच्या एन से यंग यांच्याशी होऊ शकतो. सिंधू ही महिला एकेरीत सहभागी होणारी एकमेव भारतीय आहे. जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेते सात्विक आणि चिराग यांनी गेल्या महिन्यात कोरिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर ते जागतिक क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट दुसऱ्या स्थानावर पोहोचलेले असून सध्या ते कधी नव्हे इतके फॉर्मात आहेत.
भारताच्या पुऊष एकेरीतील आव्हानाचे नेतृत्व फॉर्ममध्ये असलेला एच. एस. प्रणॉय करेल. त्याला या महत्त्वाच्या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळालेले असून त्याचा सामना फिनलंडच्या कॅले कोल्जोनेनशी होणार आहे. पुऊष एकेरीत रिंगणात असलेले इतर भारतीय हे लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत असून आपल्या पहिल्या फेरीतील सामन्यांमध्ये ते अनुक्रमे मॉरिशसच्या जॉर्जेस ज्युलियन पॉल आणि जपानच्या केंटा निशिमोटोशी खेळतील. प्रणॉय हा गेल्या 12 महिन्यांत एकेरीतील सर्वाधिक सातत्यपूर्ण खेळाडू आहे राहिलेला आणि सध्या तो जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवण्यापूर्वी त्याने मे महिन्यात मलेशिया मास्टर्स जिंकली होती. महिला दुहेरीत भारताने दोन जोड्या उतरवल्या आहेत. त्यात ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे, तर अश्विनी भट के. आणि शिखा गौतम यांचा सामना नेदरलँड्सच्या डेबोरा जिले आणि चेरिल सेनेन यांच्याशी होईल. रोहन कपूर आणि एन. सिक्की रे•ाr मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत अॅडम हॉल आणि ज्युली मॅकफर्सन या स्कॉटिश जोडीशी लढतील, तर वेंकट प्रसाद आणि जुही दिवांगन या अन्य भारतीय जोडीचा सामना सलामीच्या लढतीत जर्मनीच्या जोन्स राल्फी जॅनसेन आणि लिंडा एफलर यांच्याशी होईल. या स्पर्धेत 64 बॅडमिंटनपटू पुऊष एकेरीत, तर 48 महिला एकेरीत सहभागी होतील. याशिवाय, तीन दुहेरी विभागातील स्पर्धांमध्ये प्रत्येकी 46 संघ उतरणार आहेत.









