वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या ऑगस्टमध्ये भारतात वर्ल्ड अॅथलेटिक्स कांस्यस्तरीय काँटिनेन्टल टूरवरील स्पर्धा होणार आहे. वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या वेबसाईटवर विविध स्पर्धांच्या आयोजनाची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार भुवनेश्वरमध्ये त्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
पहिली इंडियन ओपन वर्ल्ड अॅथलेटिक्स कांस्यस्तरीय स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी कलिंगा स्टेडियमवर होणार आहे. टोकियोमध्ये 13 सप्टेंबरला वर्ल्ड अॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहे, त्याच्या पूर्वतयारीसाठी भारतातील ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे. त्यातून अॅथलेट्सना रँकिंग गुण घेण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत पुरुषांसाठी 100, 200, 400, 800, 1500 मी., लांब उडी, तिहेरी उडी, गोळाफेक, भालाफेक, 4×400 मी. रिले, महिलांसाठी 100, 200, 400, 800, 1500 मी. धावणे, लांब उडी, भालाफेक, 4×400 मी. रिले आणि मिश्र प्रकारात 4×400 मी. रिले असे क्रीडा प्रकार घेतले जाणार आहेत.









