न्हावेली / वार्ताहर
आरोंदा भटपावाणी येथे कृषी विभागाकडून कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी श्री गोरे साहेब यांनी उपस्थित महिला व शेतकरी यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास सांगितले व मार्गदर्शन केले.तसेच पी एम एफ एम इ सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन महिला व तरुणांनी कृषी विषयक उद्योगधंदे सुरू करावेत असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाला ओरोस येथून पी एम एफ एम इ चे श्री प्रताप चव्हाण यांनी उपस्थितांना कृषी प्रक्रिया जागृती पंधरवडा अंतर्गत विविध उद्योगधंदे तसेच योजनेच्या अटी ,पात्रता व योजनेविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यवेक्षक श्रीम देसाई यांनी पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
पी एम एफ एम ई प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थींचा यावेळी कृषी विभागामार्फत सत्कार करण्यात आला. जिजाऊ प्रभाग संघ आरोंदा काजू प्रक्रिया युनिट व वामन ड्राय फ्रुट्स गुळदूवे यांचे तालुका कृषी अधिकारी यांनी अभिनंदन केले .
तसेच महाराष्ट्रातील पहिले पी एम एफ एम इ अंतर्गत काजू प्रक्रिया युनिट हे जिजाऊ प्रभाग संघ आरोंदा येथे सुरू झालेले असून महिला यशस्वीरित्या चालवत आहेत. या युनिटला तालुका कृषी अधिकारी यांनी भेट दिली व माहिती घेत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन कृषी सहाय्यक आरोंदा श्रीम प्रिया पवार यांनी केले तसेच सदर कार्यशाळेला ग्रामपंचायत सदस्य श्री गोविंद केरकर श्रीम सुभद्रा नाईक तसेच आत्मा बीटीएम श्रीम मीनल परब ,कृषी सहाय्यक तळवडे श्रीम तुळसकर मॅडम ,कृषी सहाय्यक मळगाव श्रीम. मेस्त्री मॅडम तसेच जिजाऊ प्रभाग संघ आरोंदा महिला व शेतकरी उपस्थित होते.









