प्रतिनिधी/ बेळगाव
गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील एमबीए विभागाच्यावतीने एमबीए चौथ्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी बीआय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली. विद्यार्थ्यांना व्यवसाय बुद्धिमत्ता, भविष्यातील व्यवस्थापक आणि निर्णय घेण्यासंबंधी तसेच आजच्या गतिमान व्यावसायिक वातावरणात कौशल्य आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. एच. एन. शिवप्रसाद, रेखा गुरव्वागोळ, प्रा. अंजली अगरवाल, डॉ. ज्योती जमनानी, प्रा. प्रियांका अणवेकर, प्रा. निलोफर काझी यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.









