प्रतिनिधी/ बेळगाव
कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या बेळगाव शाखेतर्फे ‘एक्स्पोर्ट्स अॅन्ड ग्लोबल सप्लाय चेन’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत व्यावसायिक, उद्योजक, सरकारी अधिकारी यांना त्यांचे अनुभव कथन करण्यासाठी संधी देण्यात आली. जे उद्योजक निर्यात क्षेत्रात आहेत, त्यांनी आपले अनुभव सांगितले.
सरकारी आणि खासगी क्षेत्रात समन्वय साधणे, आव्हानांना सामोरे जात त्यावर उपाय शोधणे, व्यावसायिक वातावरण निर्माण करणे हा या कार्यशाळेचा हेतू होता. यामध्ये बेळगावसह बेंगळूर, म्हैसूर आणि हुबळी येथील उद्योजकांनी भाग घेतला.









