प्रतिनिधी/ बेळगाव
आयकर विभाग आयसीएआय यांच्यावतीने शुक्रवारपेठ, टिळकवाडी येथील स्वरुप प्लाझामध्ये दोन दिवशीय कर कार्यशाळेला प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून बी. वाय. चव्हाण, राजगोपाल पार्थसारथी, बेळगाव शाखेचे माडीवाळप्पा तिगडी, यासीम देवलापूर, वीरण्णा मुरगोड आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत कर जागरुकता, कर परतावा, कर फाईलिंग याबाबत अधिक माहिती देण्यात आली. शिवाय सर्वसामान्यांना कर आणि इतर बाबतीतील समस्यांचे निवारण करण्यात आले
यावेळी बी. वाय. चव्हाण म्हणाले, टॅक्सबाबत सर्वसामान्यांना अधिक माहिती नसते, त्यामुळे अडचणी येतात. यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.









