प्रतिनिधी/ पणजी
कोलवाळ येथील हळर्णकर शैक्षणिक संस्थेत नुकतीच शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा राबविण्यात आली. संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मच्छिमारी, पशुसंवर्धन आणि कारखाने व बाष्पक या खात्यांचे मंत्री निळकंठ हळर्णकर व प्रमुख अतिथी या नात्याने डॉ. कल्पना चावला, विज्ञान केंद्राचे संस्थापक डॉ. संजय पुजारी उपस्थित होते. तसेच, हळर्णकर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत कुलकर्णी सर, राम विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका जोआना मोंतेरो मॅडम व वरि÷ प्राध्यापिका उल्का काकडे मॅडम व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्याचबरोबर, डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्राचे इतर सहकारी, हळर्णकर शैक्षणिक संस्थेतील विविध स्तरांवरील प्राध्यापकवर्ग, शिक्षकवर्ग या कार्यशाळेस उपस्थित होते.
त्ईशस्तवन, स्वागतगीत अन् दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डायगो वाझ उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सायेशा परब यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. निळकंठ हळर्णकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे डॉ. संजय पुजारी यांनी ’इंस्पायरिंग टीचर्स, इग्नायटेड टीचर्स’ या धोरणांतर्गत ’शिक्षक कसा असावा?’ या विषयावर उपस्थित शिक्षकवर्गाला विविध उपक्रमांच्या सहयोगाने मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांची पारख करून त्यांना त्या दिशेने जाण्यास पाठबळ देणे, प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रहणक्षमता ओळखावी व त्या योग्य ते मार्गदर्शन करावे या गुणांचा परिपोष त्यांनी केला. संस्थेतील विविध स्तरांवरील शिक्षकांनी प्रतिनिधित्व करुन मनोगत व्यक्त केले.
वेताळ शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राध्यापिका सुप्रिया नावेलकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर श्री राम विद्या मंदिरच्या शिक्षिका शितल गावकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.









